पावसाने फळबागांचे नुकसान!

file photo
file photo
Updated on

परभणी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावत रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. बुधवारी (ता.१८) रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने नुकसानीत भर पडली आहे.

परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसापासून वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरणामुळे पावसाळी स्थिती निर्माण होऊन दोन दिवसापासून अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी जिल्ह्याच्या बहुतांष भागात जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मध्यरात्री १२ च्या सुमारास परभणी शहरासह अनेक भागात सुमारे आर्धा तास पाऊस झाला. वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सुरु होता. हा पाऊस परभणी, जिंतूर, सेलू, पूर्णा तालुक्यात होता. परभणी शहरात पावसामुळे भर उन्हाळ्यात रस्त्यावरुन पाणी वाहु लागले होते. वसमत रस्त्यावर पाऊस अधिक होता.

फळबांगाचे अधिक नुकसान
सायंकाळी सातच्या दरम्यान, पूर्णा, सोनपेठ, परभणी तालुक्यात झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पालम, गंगाखेड तालुक्यात काही वेळ हजेरी लागल्यानंतर पाऊस थांबला. परंतु ढगाळ वातावरण कायम राहीले. सोनपेठ तालुक्यातील डिघोळ, नरवाडी, धामोनी, कोठाळा, खपाट पिंपरी, गवळी पिंपरी या भागात गारपीट झाली. पूर्णा तालुक्यात लोखंडे पिंपळा, कावलगाव, गौर शिवारात वादळी वाऱ्यासह पपावसाने हजेरी लावली. गोळेगाव, मुंबर, देऊळगाव या शिवारात देखील सुसाट वेगाने वारे वाहुन काही वेळ पाऊस झाला. त्यामुळे पिंपळा लोखंडे, गोळेगाव शिवारातील मोसंबी बागेचे मोठे नुकसान झाले आहे. परभणी तालुक्यातील पोखर्णी शिवारात देखील पावसाने मोठे नुकसान केले आहे. या भागात जायकवाडीच्या पाण्यावर उशीरा पेरणी केलेली गहु. ज्वारी ही पिके उभी आहेत. या पिकांची कापनी आता होणार असताना बुधवारच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांची गहु, ज्वारी ही पिके अडवी झाली आहेत.

हेही वाचा - लग्नाच्या तारखाही पुढे ढकलल्या...!


 मंडळनिहाय झालेला पाऊस
परभणी शहर ३.५०, परभणी ग्रामीण ०३, दैठणा ०१, पेडगाव ०३, पिंगळी ६.५०, जांब ८.५०, पालम ०५, चाटोरी ०३, बनवस ०१, पूर्णा ०७, ताडकळस ०९, चुडावा ०४, लिमला ०४, कातनेश्वर ०३, गंगाखेड ०१, राणीसावरगाव ०१, महातपुरी १९, आवलगाव ०७, सेलू ०१, देऊळगाव ०४, कुपटा ०१, वालूर ०१,
चिकलठाणा ०५, जिंतूर ०३, सावंगी म्हाळसा ०४, बोरी०५, चारठाणा ०६, आडगाव बु०३, बामणी ०२, कोल्हा ०३ असा पाऊस झाला असून एकुण सरासरीनुसार ३.०६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
 

शासनाने नुकसान भरपाई द्यावी
मोसंबी फळाचा बहार सुरु झाला असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने  वाढीला लागलेली फळे गळु गेली आहेत. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्यादेखील मोडून पडल्या आहेत. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी.
- दिलीप दुधाटे, मोसंबी उत्पादक गोळेगाव

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com